विलोमपद तयार करण्याचा प्रयत्न केला.
'यामामा नी' नावाची संगम कालीन तमिळ कविता ऐकल्यावर विलोमपद (palindrome) असा काहीतरी असते हे समजले. आपल्या ही भाषेत खूप विलोमपद सापडतात ani बनवता येतात, पण मला वाटले की, जर तमिळ भाषेत विलोमपद वापरून भक्ती गीत बनवू शकतात, तर मराठीत का नाही? म्हणून मी विलोमपदाचा वापर करून भक्ती गीत/ ओव्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी एक बनवलेली ओवी. तुम्हाला या बद्दल का वाटते?
रे! का हा, लालसा ने सालला का हा रे.
रे महादेव काव देहा मरे.
(Search what palindromes are and read the individual lines accordingly).
दुसऱ्या ओळीत 'काव' चा वापर किती प्रमाणात बरोबर आहे का? मला वाटत होतं की 'काव' हा शब्द थोडा ग्रामीण वाटतो, त्यामुळे तो ठीक असेल.
मला जे ओळीतून सांगायचे आहे त्याचा हा अनुवाद आहे (इंग्रजीत सांगतो):
O' why did [he] get pierced by the greed?
O' Mahadev, why does [this] body die?
Posted Apr 2, 2026, 11:21 AM UTC