“Cockroach Janta Party” वर प्रश्न विचारला की देशद्रोही ठरवणार का?
देश म्हणजे BJP नाही, आणि BJP म्हणजे देश नाही हे आधी समजून घ्यायला हवं.
मी “Cockroach Janta Party” ला सपोर्ट करत नाही किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमतही नाही. त्यांचा अजेंडा काय आहे हेही माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की त्यांनी लोकांना प्रश्न विचारायला भाग पाडलं आहे, आणि ते गरजेचं आहे.
रुपयाची किंमत घसरतेय.
शुद्ध हवा नाही.
शुद्ध पाणी नाही.
चांगली सार्वजनिक वाहतूक नाही.
शहरांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
मग आपण नागरिक म्हणून प्रश्न का विचारू नयेत?
कुठे गेल्या त्या “100 Smart Cities”?
कुठे गेलं “Make in India”?
रोज फक्त जाहिराती, PR आणि reels मध्ये “India superpower” दाखवलं जातंय, पण आजूबाजूची वास्तविकता पाहायलाच लोक तयार नाहीत.
देशप्रेम म्हणजे सरकारचं आंधळं समर्थन नाही.
देशप्रेम म्हणजे देशातील समस्या मान्य करून त्यावर प्रश्न विचारणं.
प्रश्न विचारणारा देशद्रोही नसतो, तर गप्प बसणारा समाज धोकादायक असतो.
Posted May 24, 2026, 2:50 AM UTC